काश्मिरात लोकशाही नावाची गोष्टच नाही : आझाद


वेब टीम : दिल्ली
काश्मीर दौर्‍यानंतर जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि कॉंग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी काश्मीरमधील परिस्थितीवर भाष्य केले आहे.

काश्मीरमध्ये लोकशाही नावाची गोष्टच नसल्याची टीका त्यांनी केली आहे.

काश्मीर आणि काश्मिरींमध्ये सध्या जितकी निराशा आणि संकटे आहेत तशीच परिस्थिती जम्मूमध्येही आहे.

सत्ताधारी पक्षाचे 100-200 लोक वगळता तेथे कोणीही आनंदी नाही. प्रशासनाची एवढी दहशत मी याआधी कधीच पाहिली नव्हती.

जम्मू काश्मीरमध्ये लोकशाही नावाची गोष्टच दिसत नाही, असे मत आझाद यांनी जम्मू काश्मीरच्या दौऱ्यानंतर व्यक्त केले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post