काश्मीरमध्ये २ दहशतवाद्यांना जिवंत पकडलं!


वेब टीम : काश्मीर
जम्मू काश्मीरमध्ये दहशतवाद्यांची घुसखोरी वाढवून शांतता भंग करण्याचा पाकिस्तानचा डाव भारतीय लष्कराने आणखी एकदा उधळला. 

खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या दोन दहशतवाद्यांना लष्कराच्या जवानांनी जिवंत पकडले. त्यांच्या कबुलीचा व्हिडिओ लष्कराने बुधवारी सार्वजनिक करून पाकिस्तानचा खरा चेहरा पुन्हा एकदा जगासमोर आणला.हे दहशतवादी लष्कर-ए-तय्यबासाठी काम करत असल्याचे समोर आले.

जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे कलम ३७० हटवल्यानंतर पाकिस्तानची चरफड अजून सुरूच आहे. 

काश्मीरमध्ये अशांतता पसरवण्यासाठी घुसखोरीचा प्रयत्न पाकिस्तानकडून सातत्याने होत आहे. हा पाकिस्तानचा डाव भारतीय लष्कराने उधळला. 

२१ ऑगस्टला दोन पाकिस्तानी नागरिकांना पकडले असून, ते लष्कर-ए-तय्यबाशी संबंधित आहेत,’अशी माहिती लष्कराच्या चिनार कॉर्प्सचे कमांडर लेफ्टनंट जनरल के.जे. एस. ढिल्लन यांनी दिली.

मोहम्मद अजीम असे एका दहशतवाद्याचे नाव असून तो पाकिस्तानातील रावळपिंडी येथून आला असून संबंधित दहशतवादी संघटनेचे काम करत असल्याची कबुली त्याने दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post