भोले के सिपाही नहीं भूत होते है : सैफच्या 'लाल कप्तान'चा ट्रेलर प्रदर्शित


वेब टीम : मुंबई
अभिनेता सैफ अली खान त्याचा आगामी चित्रपट ‘लाल कप्तान’च्या चित्रीकरणामध्ये व्यग्र आहे.

या चित्रपटात सैफ अली खान नागा साधूंच्या भूमिकेत दिसत आहे. सैफचा चित्रपटातील अनेखा लूक पाहून चाहत्यांची चित्रपटाबाबती उत्सुकता शिगेला पोहोचली आहे.

नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला.ट्रेलर पाहता कपाळी कुंकवाचा टीळा, काजळ लावलेले डोळे असा नागा साधूंचा लुक असलेला सैफ अतिशय रागीट दिसत आहे.

ट्रेलरच्या सुरुवातीला सैफ अली खानचा आवज ऐकू येतो.सैफ घोड्यावर बसून एका व्यक्तीचा मृतदेह संपूर्ण गावातून ओढत नेताना दिसतो.

‘आदमी के पैदा होते ही काल भैंसे पर बैठकर चल पड़ता है उसे वापस लाने के लिए.आदमी की जिंदगी उतनी, जितना समय उस भैंसे को लगा उस तक पहुंचने में’ असा थरकाप उडवणारा संवाद सैफ बोलताना दिसतो.

बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हाचा देखील आवाज ऐकू येतो. ‘भोले के सिपाही नही भूत होते है’ असे सोनाक्षी म्हणते.

सैफचा चित्रपटातील हा लूक आणि अभिनय चाहत्यांच्या पसंतीला उतरलेला दिसतो. हा ट्रेलर सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post