अहमदनगर शहरातून मनसे विधानसभा लढविणार


वेब टीम : अहमदनगर
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेची शुक्रवार, दि.27 सप्टेंबर रोजी प्रमुख कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांची बैठक झाली.

विधानसभा निवडणूक नगर शहर जागेबाबत पक्षाने राज ठाकरे यांनी अहवाल मागितला असून, या विषयावर चर्चा करण्यात आली व सर्वानुमते विचार करुन पक्षाने जिल्हाध्यक्ष सचिन डफळ, जिल्हा सचिव नितीन भुतारे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज राऊत, शहराध्यक्ष गजेंद्र राशिनकर, विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष सुमित वर्मा, उपशहराध्यक्ष अशोक दातरंगे यापैकी पक्षाने कोणालाही उमेदवारी दिल्यास संधी दिल्यास संपूर्ण ताकदीने मनसे विधानसभा निवडणूक लढणार असा निश्‍चय करण्यात आला.

या बैठकीला सचिन डफळ, नितीन भुतारे, मनोज राऊत, गजेंद्र राशिनकर, सुमीत वर्मा, अनिता दिघे, तुषार हिरवे, दीपक दांगट, रतन गाडळकर, पोपट पाथरे, गणेश शिंदे, अशोक दातरंगे, अविनाश क्षेत्रे, स्वप्निल दातरंगे, अभिषेक मोरे, निलेश खांडरे, गणेश मराठे, परेश पुरोहित, नंदू भोसले आदी उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post