महाजनादेश यात्रेवर कडकनाथ कोंबड्यांचा मारा


वेब टीम : सांगली
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या महाजनादेश यात्रेच्या ताफ्यावर कडकनाथ कोंबड्या फेकण्यात आल्या.

इस्लामपूरच्या ताकारी-पलूस रोडवर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चार ते पाच कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांच्या यात्रेच्या रथापुढे येत कोंबड्या आणि अंडी फेकली.

कडकनाथ कोंबडीपालन घोटाळाप्रकरणी कारवाईच्या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हे आंदोलन केलं.

या अतिउत्साही कार्यकर्त्यांनी हातात अंडी आणि कोंबड्या घेतल्या होत्या.

 मुख्यमंत्र्यांच्या जनादेश यात्रेचा रथ येताच त्यांनी अंडी फेकली आणि कोंबड्या हवेत भिरकावल्या.

मात्र या आंदोलनात अंड्यांचं नुकसान झालंच, पण काही कोंबड्याही रथाखाली चिरडल्या गेल्या.

कडकनाथ कोंबडी पालन व्यवसायात गुंतवणूक केल्यास भरघोस नफा मिळवून देण्याचं आमिष 'महारयत अ‍ॅग्रो इंडिया प्रायव्हेट लिमिटेड कंपनी'ने दिले होते.

यामध्ये गुंतवणूक करणाऱ्या राज्यभरातील शेतकऱ्यांची वळपास 500 कोटींची फसवणूक झाली होती. यानंतर संचालक मंडळवर गुन्हाही दाखल झाला आहे.

 ही कंपनी सदाभाऊ खोत यांच्या नातेवाईकांची असल्याचा आरोप राजू शेट्टी यांनी केला होता. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post