विधानसभेसाठी आचारसंहिता लागू; २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला मतमोजणी


वेब टीम : दिल्ली
विधानसभा निवडणुकीची तारीख आज जाहीर झाली आहे. २०१४च्या निवडणुकीप्रमाणेच यंदाची विधानसभा निवडणूकही एकाच टप्प्यात होणार असून २१ ऑक्टोबर रोजी राज्यात मतदान घेण्यात येणार आहे.

त्यानंतर ३ दिवसांनी, म्हणजेच २४ ऑक्टोबर रोजी विधानसभा निवडणुकीचा निकाल जाहीर होईल. केंद्रीय निवडणूक आयोगानं पत्रकार परिषदेत निवडणुकीचा संपूर्ण कार्यक्रम जाहीर केला. हरियाणा विधानसभेची निवडणूकही महाराष्ट्रासोबतच होणार आहे.

 १२ सप्टेंबरपासून सगळेच निवडणूक आयोगाच्या पत्रकार परिषदेची वाट पाहत होते. अखेर आज मुख्य निवडणूक आयुक्त सुनील अरोरा यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजवला.

असा आहे निवडणूक कार्यक्रम
अर्ज भरणे सुरू 27 सप्टेंबर
अर्ज भरणे अंतिम 4 ऑक्टोबर
अर्ज छाननी 5 ऑक्टोबर
माघार 7 ऑक्टोबर
मतदान 21 ऑक्टोबर
मोजणी 24 ऑक्टोबर

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post