चंद्रावरील पाउलखुणा होत नाही कधीच नष्ट; काय आहे कारण वाचा


वेब टीम : न्यूयॉर्क
सुमारे 47 वर्षांपूर्वी अमेरिकेने मानवाला चंद्रावर पाठविले होते. निल आर्मस्ट्रॉंग हे चंद्रावर पाऊल ठेवणारे पहिले मानव ठरले आहेत. त्यानंतर अंतराळयात्री युजीन सेरनन यांनी चंद्रावर पाऊल ठेवले होते.

म्हणजेच 1972 साली मानवाने चंद्रावर आपल्या पाऊलखुणा सोडल्या आहेत. उल्लेखनीय म्हणजे या पाऊलखुणा आजही चंद्रावर जशाच्या तशा आहेत. या पाऊलखुणा नष्ट न होण्याचे कारणही तसेच आहे.

अॅरिझोना स्टेट युनिव्हर्सिटीचे प्रोफेसर मार्क रॉबिनसन यांनी सांगितले की, चंद्रावरच्या जमिनीवर धुळीचे आवरण आहे. यामध्ये मोठ्या प्रमाणात मातीचे कण आहेत.

यामुळे चंद्राच्या भूमीवर पाय ठेवल्याने पाऊलखुणा तयार होतात. निल ऑर्मस्ट्रॉंग आणि युजीन सेरनन यांच्या पाऊलखुणा लाखो वर्षांपर्यंत तशाच राहतील. कारण तेथे वातावरण नाही. यामुळे पाऊलखुणा नष्ट होण्याचे कारणच नाही.

चंद्राचा केवळ 59 टक्के भाग पृथ्वीवरून दिसतो. चंद्रावर ज्याठिकाणी सूर्याची किरणे पडतात, तेथील तापमान 180 अंश सेल्सिअस इतके जास्त असते. मात्र, ज्या ठिकाणी सूर्याची किरणे पोहोचत नाहीत, तेथील तापमान उणे 153 अंश सेल्सिअसपर्यंत इतके कमी असते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post