कर्जदारास नोटीस बजावणाऱ्या अधिकाऱ्याला मारहाण करून लुटले


वेब टीम : अहमदनगर
कर्जदारास नोटीस बजाविण्यास गेलेल्या वसुली अधिकार्‍यांना 10 ते 15 जणांनी लोखंडी रॉडने व लाकडी दांडक्याने मारहाण करून रिव्हॉल्वरचा धाक दाखवुन त्यांच्याकडीलच 15 हजार 500 रूपये रोख, लॅपटॉप व सोन्याचे दागिने असा ऐवज बळजबरीने लुटला. ही घटना शेवगाव तालुक्यातील खानापुर येथे शुक्रवारी (दि.13) दुपारी 3 वा. घडली.

अंकित रामरतन अग्रवाल (वय 32, रा. आनंदनगर, मल्हार चौक, स्टेशन रोड, नगर) हे इस्पायर फायनान्स कंपनीमध्ये नोकरीला असुन ते त्यांच्या सहकार्‍यासह शेवगाव तालुक्यातील खानापुर येथील गणेश शिवाजी पाडळे यांना नोटीस बजाविण्याकरीता गेले असता पाडळे यांना राग आल्याने त्यांनी इतर 10 ते 15 साथीदारांना जमा करून अग्रवाल व त्यांच्या सहकार्‍यास लोखंडी रॉड व लाकडी दांडक्याने जबर मारहाण केली. तसेच पाडळे याने त्याच्या जवळील रिव्हॉल्वर अग्रवाल यांच्या कानाला मारून जीवे ठार मारण्याची धमकी दिली. तसेच मारहाण करीत असताना त्यांच्याकडे असणारी 15 हजार 500 रूपये रोख, लॅपटॉप व सोन्याचे दागिने असा ऐवज काढुन घेतला. गंभीर मारहाणीमुळे अग्रवाल यांना तातडीने रूग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी अंकित अग्रवाल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शेवगाव पोलिसांनी गणेश शिवाजी पाडळे (रा. खानापुर, ता. शेवगाव) व इतर 10 ते 15 इसमांविरूध्द भादंविक 395, 323, 504, 506 प्रमाणे गुन्ह्याची नोंद केली आहे. अधिक तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक ठाकरे हे करीत आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post