पाकव्याप्त काश्मीरवर कारवाई करण्यासाठी सैन्यदल तयार : लष्करप्रमुख रावत


वेब टीम : दिल्ली
पाकव्याप्त काश्मीरची पाकिस्तानच्या तावडीतून सुटका करण्याची गरज असून पाकव्याप्त काश्मीरशी संबंधित कोणत्याही मोहिमेसाठी भारतीय लष्कर तयार आहे, असे वक्तव्य लष्करप्रमुख जनरल बिपिन रावत यांनी केले.

मात्र, यावर सरकारला निर्णय घ्यायचा आहे, असेही रावत पुढे म्हणाले. पाकव्याप्त काश्मीरबाबत पंतप्रधान कार्यालयाचे राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांनी केलेल्या वक्तव्यावर प्रतिक्रिया देताना रावत यांनी आपले म्हणणे मांडले.

लष्कराची कोणत्याही कारवाईसाठी तयारी आहे का, या प्रश्नाचे उत्तर देताना रावत यांनी भारतीय लष्कर कोणत्याही कारवाईसाठी तयार आहे. पाकव्याप्त काश्मीरबाबत सरकारने केलेल्या वक्तव्याबाबत आपण खूश असल्याचेही रावत म्हणाले.

याबाबत सरकारने निर्णय घेतल्यास आणि तसे आदेश आल्यास आम्ही तयारच आहोत. यापूर्वी केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी पाकव्याप्त काश्मीरबाबत पाक पंतप्रधान इम्रान खान यांना इशारा दिला होता.

पाकव्याप्त काश्मीरबाबत यापुढे पाकिस्तानशी कोणत्याही प्रकारची चर्चा होणार नाही, असे राजनाथ सिंह यांनी म्हटले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post