वेब टीम : नाशिक मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नाशिकच्या स...
वेब टीम : नाशिक
मतांसाठी शरद पवारांकडून काश्मीर मुद्द्यावर अपप्रचार केलं जाणं दुर्देवी असल्याचं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे. नाशिकच्या सभेत बोलताना नरेंद्र मोदी यांनी शरद पवारांवर जाहीर टीका केली.
व्यासपीठावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकात पाटील, पंकजा मुंडे, गिरीश महाजन, एकनाथ खडसे, उदयनराजे भोसले आदी उपस्थित होते.
“काँग्रेस गोंधळलं आहे हे समजू शकतो. पण शरद पवार यांच्यासारखा अनुभवी नेता काही मतांसाठी चुकीचं विधान करत असेल तर फार दुख होतं. शरद पवारांना शेजारी देश चांगला वाटतो.
ही त्यांची इच्छा. तेथील नेते त्यांना कल्याणकारी वाटतात. पण हे संपूर्ण देशाला माहिती आहे की, दहशतवाद्यांची फॅक्टरी कुठे आहे ? हिंसाचार शोषण झाल्याचे फोटो कुठून येतात ?,” असं नरेंद्र मोदींनी सांगितलं.
“काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांनी जे सहकार्य करायला हवं होतं ते दिसत नाही. विरोधक म्हणून त्यांनी सरकार, माझ्यावर टीका करणं त्यांचा हक्क. पण राष्ट्रहिताच्या बाबतीत असं बोलणं जे शत्रुंसाठी फायद्याचं होईल, त्यावरुन भारतावर टीका होणं दुर्दैवी आहे. अशा लोकांना ओळखणं गरजेचं आहे,” असंही नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
पंंतप्रधान म्हणाले, नाशिकला आम्हाला संरक्षणाचे महत्वाचे केंद्र बनवायचे आहे. त्यासाठी योजना आखली जात आहे. महाराष्ट्राच्या विस्तीर्ण अशा सागर किनार्याच्या विकासासाठी अदीच लाख कोटी रुपयांची तरतूद केली आहे. त्यातील मोठा भाग महाराष्ट्राला मिळणार आहे. तेथील बंदरे अधिक मजबूत करून रोजगाराच्या नव्या संधी निर्माण लकरण्यावर सरकारचा भर आहे.
फडणवीस सरकार हे विकासासाठी कटीबध्द असणारे सरकार आहे. जलयुक्त शिवारचे कामप्रशंसनीय आहे. १७ हजार गावे यातून जलसंकटमुक्त झाली आहेत.
या कामाला येत्या पाच वर्षात गती द्यायची आहे. या सरकारने रोजगाराच्या संधी निर्माण केल्या. पर्यटनाला चालना दिली आहे, असे ते म्हणाले.
 

 
							     
							     
							     
							     
 
 
 
 
