रिक्षाचालकाला तब्बल ३७ हजाराचा दंड! कुठे घडलाय प्रकार, पहा


वेब टीम : गुरुग्राम
नव्या मोटार वाहन कायद्यामुळे दंडाच्या रकमेत मोठी वाढ झाली आहे. या कायद्यामुळे वाहनचालकांना जबर दंड होत आहे.

 हरियाणाच्या गुरुग्राममधील रिक्षाचालकांनाही नियम मोडल्यामुळे मोठ्या दंडाला सामोरे जावे लागले आहे.

गुरुग्राममधील तीन रिक्षाचालकांना अनुक्रमे ९ हजार, २७ हजार व ३७ हजार रुपये दंड झाला आहे.

राहुल चंद या रिक्षाचालकाला विनापरवाना वाहन चालवणे, नोंदणी नसताना वाहन चालवणे, प्रदूषणाचे नियम मोडणे, सिग्नल मोडणे व विमा नसताना वाहन चालवणे या ५ नियमांचा भंग केल्याप्रकरणी २७००० हजार रुपयांचा दंड झाला आहे.

 काही दिवसांपूर्वीच एका युवकाला २३ हजार रुपये दंड ठोठावला होता, त्याच्या गाडीची किंमत १५ हजार असल्याने ही घटना चर्चेत आली होती.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post