वेब टीम : अहमदनगर जमिनीच्या वादातुन राग आल्याने चौघांनी जातीवाचक शिवीगाळ केली. डोक्यात सिमेंटचा पोल मारून चार वर्षीय मुलाचा खुन केल्याच...
वेब टीम : अहमदनगर
जमिनीच्या वादातुन राग आल्याने चौघांनी जातीवाचक शिवीगाळ केली. डोक्यात सिमेंटचा पोल मारून चार वर्षीय मुलाचा खुन केल्याची हृदयद्रावक घटना श्रीगोंदा तालुक्यातील शेडगाव परिसरातील गट नं. 98 मध्ये गुरूवारी (दि.5) दुपारी 2.30 च्या सुमारास घडली. शेडगाव येथील गट नं.98 मधील जमिनीचा वाद कोर्टामध्ये सुरू होता.
त्या वादाचा निकाल लागल्यानंतर नाना आघाव याचा मुलगा विष्णु आघाव व विष्णु आघाव याचा मुलगा (सर्व रा. भाणगाव, ता.श्रीगोंदा) हे शेडगाव येथील शेत जमिनीत आले.
तेथील काळकुशा काळे व त्याची पत्नी सौ. उमा काळकुशा काळे यांना म्हणाले, तुमचा या जमिनीशी काहीही एक संबंध नाही. कोर्टाचा निकाल आमच्या बाजुने लागला, असे म्हणुन जातीवाचक अर्वाच्य भाषेत शिवीगाळ करून तुमच्या सर्व पिढ्या संपवुन टाकू, असे धमकी दिली.
यावेळी त्यांनी बरोबर आणलेल्या सिमेंटच्या पोलने काळकुशा काळे याच्या 4 वर्षाच्या मुलगा गणेश याच्या डोक्यात मारून त्याचा खुन केला आणि काळकुशा व त्याच्या पत्नीस बेदम मारहाण करून जखमी केले.
या प्रकरणी श्रीगोंदा पोलिसांनी उमा काळे यांच्या फिर्यादीवरून भादंविक 302, 307, अ.जा.ज. 4 (आय)1, (एस),3 (1)(आर) (एस) प्रमाणे खुनाच्या गुन्ह्याची नोंद केली असून, तपास पोलिस उपविभागीय अधिकारी (ग्रामीण) सातव हे करीत आहेत.