'या' वाळवंटात ऐकू येते संगीत


वेब टीम : मोरोक्को
जगाच्या पाठीवर काही ठिकाणे अतिशय गूढ अशीच आहेत. त्यामध्ये मोरोक्कोच्या वाळवंटातील एका ठिकाणाचाही समावेश होतो.

याठिकाणी बहुतांश वेळी वेगवेगळ्या प्रकारचे संगीत ऐकू येते. कधी ड्रम तर कधी गिटार व व्हायोलिन तर कधी अन्य वाद्यांचा आवाज याठिकाणी ऐकू येतो.

ज्या वाळवंटात एखाद्या व्यक्तीस राहणेही दुरापास्त आहे अशा ठिकाणी संगीताची धून ऐकू येणे हे अनेकांना आश्चर्यकारक वाटते.

या संगीताचे उल्लेख तेराव्या शतकापासूनच्या नोंदीत पाहायला मिळतात. तेराव्या शतकातील एक प्रवासी मार्को पोलो पहिल्यांदा चीनला गेला त्यावेळी वाटेत या वाळवंटात त्याला संगीत ऐकू आले होते.

अर्थातच त्याला हा भुताटकीचा प्रकार असावा असे त्यावेळी वाटले होते. मात्र, आधुनिक काळात यावर वैज्ञानिक दृष्टिकोणातून संशोधन करण्यात आले आहे. या वाळवंटातील वाळूच्या टेकड्यांमधील वाळू घसरते त्यावेळी तिच्या कंपनांमधून वेगवेगळे आवाज निर्माण होतात, असे संशोधकांना आढळले.

त्यासाठी वाळूच्या कणांचा आकारही जबाबदार असतो. कणांचा आकार आणि वाळू घसरण्याची गती संगीताच्या ध्वनीला कारक आहे. वा-याच्या झुळकीबरोबर हा आवाज सर्वत्र पसरतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post