नारायण राणेंना धक्का; स्वाभिमानीच्या नेत्यांनी केला शिवसेनेत प्रवेश


वेब टीम : मुंबई
मंदार केणी यांच्या पाठोपाठ आणखी महाराष्ट्र् स्वाभिमानचे नगरसेवक यतीन खोत, राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका शैलजा गिरकर आणि दर्शना कासवकर  शिवसेनेच्या गळाला लागले आहेत.

विधानसभा निवडणुकीत नारायण राणेंच्या मुलांना उमेदवारी मिळाली तर शिवसेना आपला उमेदवार उभा करेल, अशा इशारा शिवसेना नेते दीपक केसरकर यांनी दिला होता.

तर नारायण राणे भाजपमध्ये गेले तरी शिवसेनेला काही फरक पडत नाही, असे खोचक वक्तव्य शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केले आहे.

नारायण राणे आपल्या मुलांच्या स्वार्थासाठी भाजपत जात आहेत. लोकांना ते माहीत आहे. राणे भाजपमध्ये गेले तर कार्यकर्ते त्यांच्यासोबत राहणार नाहीत.

राणेंचे अनेक कार्यकर्ते शिवसेनेच्या वाटेवर असून ते लवकरच सेनेत प्रवेश करतील, असा दावा आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.

नारायण राणे यांच्या महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाचे मालवन तालुका अध्यक्ष आणि नगरसेवक मंदार केणी यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.

केणी यांनी ‘मातोश्री’वर जाऊन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत शिवबंधन बांधले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post