नक्षलवाद्यांनी भूसुरुंग स्फोटाद्वारे डिझेल टँकर उडवला, तीन जणांचा मृत्यू


वेब टीम : कांकेर
छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या कांकेर जिल्ह्यातील ताडोकी परिसरात मंगळवारी नक्षलवाद्यांनी एक मोठा घातपात घडवला.

नक्षलवाद्यांनी भूसुरूंगाद्वारे एक डिझेल टँकर उडवला असून यामध्ये तीन जणांचा मृत्यू झाला.

या स्फोटात मृत्यू झालेल्या तिघांची अद्याप ओळख पटलेली नाही. परिसरात सुरू असलेल्या रेल्वे लाइनच्या कामाच्या ठिकाणी हे डिझेल टँकर नेले जात असल्याची माहिती समोर आली आहे.

स्फोटानंतर स्थानिक पोलीस व नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाल्याचीही माहिती आहे.भूसुरूंग पेरल्यानंतर नक्षलवादी परिसरातच दबा धरून बसलेले होते.

याच दरम्यान डिझेलच्या टँकराचा स्फोट झाला.पोलीस अधीक्षक के एल ध्रुव यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की,स्फोटाची माहिती मिळताच, पोलीसाची तुकडी घटनास्थळी दाखल झाली व नक्षलवादी आणि पोलीसांमध्ये चकमक सुरू झाली.

छत्तीसगडमधील नक्षलग्रस्त भाग असलेल्या बस्तर परिसरात सध्या नक्षलविरोधी अभियान जोरदार सुरू आहे.

सुकमा जिल्ह्यात १५ सप्टेंबर रोजी जवानांनी चकमकीत तीन नक्षलींचा खात्मा केला होता. त्याच्या एक दिवस अगोदरच बस्तर परिसरात तीन नक्षलवाद्यांना ठार केले होते.

जवानांकडून होत असलेल्या या कारवायांमुळे नक्षलवाद्यांचे धाबे दणाणले असून काहीजण आत्मसमर्पणचा मार्ग स्वीकरला, तर काहीजण रोष व्यक्त करण्यासाठी नागरिकांवर हल्ले करत असल्याचे समजते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post