कांदा एक हजाराने घसरला; 3500 रुपये मिळाला भाव


वेब टीम : अहमदनगर
मागील आठवड्यात वधारलेले कांद्याचे दर काही प्रमाणात घसरले असून गुरुवारी (दि.26) नगरमध्ये कांद्याचे दर 3500 रुपये प्रति क्विंटलप्रमाणे निघाले आहेत. 

सरासरी बाजार भाव 2200 ते 3200 रुपये क्विंटलपर्यंत निघाले आहे.

मागील काही दिवसांपासून कांद्याची आवक कमालीची घटली असून मागणी वाढत राहिल्याचे दरही कमालीचे वधारले होते. कांदा प्रतिक्विंटल 4600 रुपयांवर पोहोचला होता. 

त्यामुळे कांदा उत्पादक शेतकर्‍यांमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले होते. या आठवड्यात बाजार भावात मात्र घसरण झाली आहे.

बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात गुरुवारी (दि.26) सुमारे 30 हजार कांदा गोण्यांची आवक झाली. 

मागील लिलावाच्या तुलनेत बाजार भावात सुमारे एक हजार रुपयांची घसरण होत प्रतिक्विंटल 3500 रुपये हा सर्वाधिक बाजारभाव निघाला. सध्या बाजारात गावरान कांदा येत असून लाल कांद्याची आवक जेमतेम आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post