भारताने काश्मीरवरुन युद्धाची बीजं रोवली : पाकिस्तान


वेब टीम : इस्लामाबाद
जम्मू-काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारे कलम ३७० रद्द करुन भारताने युद्धाची बीजं रोवली असे पाकिस्तानी लष्कराने म्हटले.

काश्मीरमधील परिस्थिती प्रदेशासाठी धोकादायक आहे. भारताच्या कृतीतून युद्धाची बीज रोवली जात असल्याचा आरोप पाकिस्तानी लष्कराचे प्रवक्ते मेजर जनरल असीफ गफूर यांनी केला.

पाकिस्तानची सशस्त्रे दले प्रदेशात शांतता निर्माण करण्यासाठी प्रयत्न करत आहेत. पण भारताने कुठलेही ऑपरेशन केले तर त्याला ठोस प्रत्युत्तर दिले जाईल असे गफूर म्हणाले.

भारत आमच्यावर हल्ला करुन आम्हाला कमकुवत करायचा विचार करत असेल तर आम्हाला त्यांना सांगायचे आहे की, युद्ध फक्त शस्त्र आणि आर्थिक ताकतीवर लढले जात नाही तर त्यात देशभक्ती सुद्धा असते असे गफूर म्हणाले.

अण्वस्त्राचा पहिला वापर न करण्याबद्दल आम्ही कुठलही धोरण ठरवले नाही. आम्ही धाक ठेवण्यासाठी अण्वस्त्राची निर्मिती केली.भारताच्या बाबतीत धोरण काय कसे असावे तो त्यांचा विषय आहे असे गफूर म्हणाले. 

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post