बाप रे... चक्क पोलिसांनी ‘सेक्स’साठी मागितल्या 3 मुली


वेब टीम : नागपूर
नागपूर पोलिसांच्या सामाजिक सुरक्षा शाखेतील दोन पोलिसांनी चक्क लाच म्हणून शरीर सुखासाठी तीन मुलींची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

या मागणीचे पुरावे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांच्या हाती लागल्यानंतर त्या दोन पोलिसांना अटक करण्यात आली आहे.या प्रकारामुळे पोलिस दलाविषयी राज्यात उलटसुलट चर्चा चालू आहे.

नागपूर परिसरात सेक्स रॅकेट चालवणाऱ्या महिलेवर सामाजिक सुरक्षा विभागाने कारवाई केली होती. ही कारवाई थांबवण्यासाठी ३५ हजार रुपयांची लाच आणि शरीर सुखासाठी तीन मुलींची मागणी करण्यात आली होती.

या अनोख्या लाचेच्या मागणीची तक्रार लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दाखल झाल्यानंतर पोलीस अधीक्षकांनी सापळा रचला आणि भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने दोन पोलिसांना ताब्यात घेतले.

याबाबद मिळालेली माहीती अशी कि स्पा सेंटरच्या नावाखाली सेक्स रॅकेटचा पर्दाफाश करण्यासाठी भंडारा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाला पाचारण करण्यात आले होते.

त्यावेळी पडताळणीमध्ये सामाजिक सुरक्षा विभागाचे दामोधर व शितलप्रसाद यांनी तक्रारदार महिलेकडे रोख ३५ हजार आणि शरीरसुखासाठी तीन मुलींची मागणी केल्याचे आढळून आले होते.

एलसीबीने २९ ऑगस्ट रोजी या लाचेची पडताळणी केली होती. आरोपींना अटक करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर यांनी दिली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post