पोलीस दलात खळबळ ; तडीपार गुंडावर पैसे ओवाळत असतानाचा व्हिडीओ व्हायरल


वेब टीम : अहमदनगर
नगर शहरात मोहरम विसर्जन मिरवणुकीत बंदोबस्ताला असलेल्या साध्या वेशातील पोलीस कर्मचाऱ्याने गुन्हेगार रशिद दंडावर पैसे ओवाळल्याचा एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे.

साध्या वेशातील पोलिस कर्मचारी तडीपार गुंडावर पैसे ओवाळत असल्याचं या व्हिडिओत दिसत आहे. तसेच त्या गुंडाबरोबर पोलिसाने मनसोक्त डान्स केला.

पोलिसाच्या या व्हिडीओमुळे खाकीची लक्तर वेशीला टांगली गेली आहेत. जिल्हा पोलीस अधीक्षक त्या पोलिसावर कोणती कारवाई करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

गेल्या आठवड्यात नगर शहरात मोहरम विसर्जनच्या आठव्या दिवशी मिरवणूक निघाली होती. त्यात नगर शहरातून दोन वर्षांसाठी हद्दपार केलेला गुन्हेगार रशिद अब्दुल अजिज उर्फ रशिद दंडा हा गुन्हेगार सहभागी झाला होता.

त्यावेळी बंदोबस्ताला असलेला कोतवाली पोलीस स्टेशनचा साध्या वेशातील पोलीस कर्मचारी गुन्हेगार रशिद दंडा याच्यावर पैसे ओवाळत असल्याचा एक व्हिडिओ  समाजमाध्यमात व्हायरल झाला आहे.

दंडा याला घरगुती कारणांसाठी काही दिवस तडीपारीतून काही दिवसांसाठी सूट देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांकडून मिळाली. परंतु पोलीस कर्मचारीच गुंडाच्या अंगावर पैसे ओवाळत असल्याच्या व्हिडिओमुळे हा पोलीस कर्मचारी अडचणीत आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post