कोकणासह मध्य महाराष्ट्र, विदर्भात अतिवृष्टीचा इशारा


वेब टीम : पुणे
राज्यात पाऊस पुन्हा कहर घालण्याची शक्यता वातावरणातील बदलांमुळे निर्माण झाली आहे. येत्या आठवड्यात राज्याच्या सर्वच भागात प्रामुख्याने मुंबई, ठाण्यासह कोकण विभाग तसंच मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

18 ते 20 सप्टेंबर याकाळात मुसळधार पावसाची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून व्यक्त करण्यात आली आहे.

गेल्या 2 ते 3 दिवसांपासून मुंबईमध्ये जरी पावसाचा जोर ओसरला असला तरी उपनगरांमध्ये जोरदार पाऊस सुरू आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पावसाने दडी मारल्याचं चित्र आहे. पण बुधवारी बहुतेक राज्यांत मुसळधार पाऊस होणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आला आहे.

तिकडे मध्यप्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात येत्या 2 दिवसांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. स्कायमेटने हा अंदाज वर्तवला आहे.

मध्यप्रदेशच्या उत्तरेकडील भागात हवेचा कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने मध्य प्रदेशसह तेलंगणा आणि महाराष्ट्रात पुढील 3 दिवसांत सर्वदूर पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post