राम शिंदेंचे पवारांना धक्क्यावर धक्के; सभापती पुन्हा भाजपवासी


वेब टीम : अहमदनगर
कर्जत येथील पंचायत समितीचे सभापती सुभाष आव्हाड यांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.

अवघ्या काही दिवसात पुन्हा आव्हाड यांनी पालकमंत्री प्रा.राम शिंदे यांच्या उपस्थितीत भाजपात प्रवेश केला आहे.

या प्रवेशामुळे कर्जत-जामखेड मतदारसंघाच्या आमदारकीची निवडणूक चुरशीची होणार आहे. पालकमंत्री राम शिंदे यांच्याकडून रोहित पवारांना धक्यावर धक्के देत आहेत.

आज कर्जत तालुक्यातील शेगुडवाडी येथे सभापती आव्हाड यांनी पालकमंत्री प्रा. राम शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रवेश घरवापसी केली.

 यापवेळी कर्जत नगरपंचायतीचे नगराध्यक्ष नामदेव राऊत, जामखेड भाजप तालुकाध्यक्ष रवींद्र सुरवसे, जिल्हा सरचिटणीस मनोज कुलकर्णी, भाजपा तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, जामखेड नगराध्यक्ष निखिल घायतडक, माजी सभापती भगवान मुरूमकर, ज्योती क्रांती संस्थेचे अध्यक्ष आजीनाथ हजारे आदी उपस्थित होते.

दरम्यान आव्हाड यांच्या प्रवेशामुळे रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्था पसरली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post