कोणत्याही नेत्याच्या सभेची आपल्याला गरज नाही, मी आहे ना : यशवंतराव गडाख, शंकररावांनी भरला अर्ज


वेब टीम : अहमदनगर
कोणता नेता येणारंय तुमच्या सभेला? काय गरज आहे आपल्याला कोणाची? सामान्यांच्या प्रश्नांसाठी लढण्यासाठी आपल्याकडे विचार आहेत.

त्यामुळे ‘डरो मत मैं हूँ ना’ अशा शब्दांत माजी खासदार, साहित्यिक यशवंतराव गडाख यांनी माजी आ. शंकरराव गडाख यांना दिलासा देत आगामी विधानसभेच्या निवडणुकीत विजयश्री खेचून आणण्यासाठी सज्ज रहा, असे आवाहन उपस्थित हजारो कार्यकर्त्यांना केले.

प्रारंभी क्रांतिकारी शेतकरी पक्षाच्या  कार्यकर्त्यांनी भव्य अशी दुचाकी रॅली काढली. यानिमित्त नेवाशातल्या एका मंगल कार्यकर्त्यांचा मेळावा पार पडला.

यावेळी बोलताना माजी खा. यशवंतराव गडाख म्हणाले, ‘मुळा’ आपल्या सर्वांची दिवाळी आनंदात ‘साजरी’ करणारआहे. मात्र सर्वच नेवासकरांची दिवाळी आनंदात साजरी व्हावी, यासाठी विधानसभेची ही दिवाळी ‘थाटामाटात’ साजरी करा.

आपल्याकडे विचार आहेत, शंकररावांमध्ये विकासकामे करण्याची धमक आहे. यापुढे सर्वसामान्य माणसाला भेटा, त्याचे प्रश्न निटपणे समजून घ्या, त्याला आपल्या पक्षाची भूमिका समजावून सांगा.

आगामी २० दिवसांच्या कालखंडामध्ये तन मन आणि धनाने शंकररावांना आमदार करण्यासाठी जोरदार संघर्ष करा. विजय आपलाच होणार आहे,

दरम्यान, मेळाव्यात सर्वांचे आभार मानताना प्रशांत गडाख म्हणाले, ज्या गटातून सर्वाधिक मताधिक्य मिळेळ, त्या गटाची शंकररावांनी जास्तीत जास्त कामे मार्गी लावावीत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post