एका पक्षात दोन प्रधान, दोन निशाण, दोन संविधान चालू शकत नाही : संबीत पात्रा


वेब टीम : पुणे
इडी’चा अर्थ ‘इन्फोर्समेंट डिरेक्टोरेट’ असा असून ‘इव्हेंट डेव्हलपमेंट’ नाही, असा टोला भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते संबित पात्रा यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांना लगावला.

अजित पवारांचा राजीनामा हा त्यांच्या पक्षातील विषय असला तरी, एका पक्षात दोन प्रधान, दोन निशाण, दोन संविधान चालू शकत नाही म्हणून, पक्षातले कलम ३७० हटविले,मग देशात कलम ३७० हटविण्याचा विरोध कशासाठी, असा खोचक सवालही त्यांनी केला.

जम्मू-काश्मीरमधून कलम ३७० रद्द केल्यानंतर भाजपतर्फे देशभरात राष्ट्रीय एकता अभियान राबविले जात आहे.

या अभियानांतर्गत कलम ३७० हटविल्याचे फायदे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचविले जात आहेत.

त्या अंतर्गत संबित पात्रा यांनी शनिवारी पुण्यात पत्रकारांशी संवाद साधला. खासदार गिरीश बापट, संजय काकडे, भाजपचे प्रदेश सचिव राजेश पांडे उपस्थित होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post