संग्राम जगताप हेच राष्ट्रवादीचे उमेदवार


वेब टीम : अहमदनगर
 पाच वर्षात राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप यांनी शहरात भरीव अशी विकास कामे केली आहेत. त्यातच १७ वर्षांपासून धुळखत पडून असलेल्या आयटी पार्क मध्ये नवनवीन कंपन्या येत आहेत. या सर्व विकास कामाचा अनेकांनी धसका घेतला आहे.

त्यामुळे विरोधी पक्षतील लोकांनीच आ.जगताप याच्या पक्षप्रवेशाच्या वावड्या उठवल्या आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार संग्राम जगताप हे राष्ट्रवादीचे उमेदवार असतील असा विश्वास राष्ट्रवादीचे शहरजिल्हाध्यक्ष प्रा.माणिक विधाते यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केला.

राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा खा. शरद पवार हे येत्या शनिवारी नगर मध्ये येत आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी बाबासाहेब गाडळकर उपस्तीत होते.


पुढे बोलताना प्रा.विधाते म्हणले, आमदार जगताप यांच्य बाबत विरोधक पक्षांतराच्या चर्चा घडवून आणत आहे. त्या निव्वळ अफवा आहेत, स्वत: संग्राम जगताप यांनीही कधी याबाबत बोललं नाही. येत्या विधानसभा निवडणुकीत आमदार जगताप हेच राष्ट्रवादीचे उमेदवार राहणार असल्याचे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post