भुजबळांना शिवसेनेत घेण्यास विरोध : राऊत


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांना शिवसेनेत प्रवेश देणार नसल्याची स्पष्ट भूमिका खासदार संजय राऊत यांनी घेतली.

येवला येथे बोलताना त्यांनी नारायण राणे यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेवरही मत मांडले. राणेंना भाजपमध्ये प्रवेश द्यावा किंवा नाही हा त्यांचा विषय आहे. त्यांच्या भाजप प्रवेशाला आमचा विरोध नाही, असे ही ते म्हणाले.

येवला मतदारसंघातील शिवसेना नेते आणि पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांची भेट घेतली. भुजबळ यांना पक्षात प्रवेश देऊ नये, अशी मागणी त्यांनी राऊत यांच्याकडे केली.

 त्यावर भुजबळ यांना शिवसेनेत घेणार नाही, असे आश्वासन राऊत यांनी पत्रकार परिषदेत दिले.मी आहे तिथे बरा आहे असे भुजबळांनी सांगितल्याने त्यांच्या प्रवेशाबाबतचे चित्र स्पष्ट झाल्याचे ते म्हणाले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post