सौरव गांगुली होणार भारतीय संघाचा प्रशिक्षक?, दिले संकेत


वेब टीम : दिल्ली
सध्या मी आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचा सल्लागार आहे तसेच बंगाल क्रिकेट संघटनेचा अध्यक्ष असून दूरचित्रवाणीवर समालोचकही आहे.

या सर्व जबाबदाऱ्यांतून मोकळा झाल्यावर भारतीय संघाच्या प्रशिक्षकपदाच्या शर्यतीत मी नक्कीच असेन. माझी निवड मात्र व्हायला हवी. पण एक बाब स्पष्ट करतो आता मला रस नसला तरी भविष्यात मला भारतीय संघाचा प्रशिक्षक होण्यास आवडेल, असे भारताचा माजी कर्णधार सौरव गांगुलीने स्पष्ट केले..

एका प्रायोजित कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या सौरव गांगुलीला माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीविषयी विचारले असता माजी कर्णधार गांगुली म्हणाला, धोनीच्या निवृत्तीचा निर्णय स्वत: धोनी आणि टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली या दोघांनी चर्चा करूनच घ्यायचा आहे.

याबाबतीत विराट कोहली आणि बीसीसीआयच्या निवड समितीची भूमिका काय आहे, हे मला माहीत नाही, असेही गांगुलीने सांगितले. भारतीय संघाला त्यांच्याच मायभूमीत पराभूत करणे अवघड आहे, असे सांगून सौरव गांगुलीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारतीय संघाचे पारडे जड आहे, असे संकेत दिले.

आयपीएलमधील दिल्ली कॅपिटल्स संघाचे सल्लागारपद स्वीकारल्यानंतर दिल्ली कॅपिटल्स संघाने यंदा प्रथमच उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली. गेल्या सात वर्षांत दिल्लीचा संघ तळाशी होता. त्यामुळेच गांगुली टीम इंडियाचे प्रशिक्षक होण्यास उत्सुक असावा.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post