पवारांचा यु टर्न : ईडीच्या कार्यालयात जाणार नाही


वेब टीम : मुंबई
कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल त्यामुळे मी ईडीच्या कार्यालयात जाणार नाही.

मुंबई पोलिस आयुक्तांच्या विनंतीचा मी आदर करतो.’ असे सांगत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी ईडीच्या कार्यालयात जाण्याचा निर्णय मागे घेतला आहे.

‘ज्या बँकेचा मी कधी सभासदही नव्हतो त्याबाबत माझ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.

राज्यातील निवडणूक तोंडावर असताना विरोधी पक्षातील नेत्यांना त्रास देण्यासाठी हे असले प्रकार केले गेले.

या प्रसंगी पाठिंबा देणाऱ्या संजय राऊत, राहुल गांधी, मनमोहन सिंग, शिवसेना व काँग्रेस पक्षाचे आणि राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो’ असेही त्यांनी नमूद केले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post