वेब टीम : मुंबई लोकसभा निवडणुकीच्यावेळी राम मंदिर उभारण्याबाबत मुद्दा करण्यात आला होता. आता आगामी निवडणुकांपूर्वी राम मंदिराचा मुद्दा प...
वेब टीम : मुंबई
लोकसभा निवडणुकीच्यावेळी राम मंदिर उभारण्याबाबत मुद्दा करण्यात आला होता. आता आगामी निवडणुकांपूर्वी राम मंदिराचा मुद्दा पुन्हा तापू लागला आहे.
शिवसेनेने हा मुद्दा पुन्हा रेटण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर नाशिक दौर्यात मोदी यांनी राम मंदिरावरून शिवसेनेला अप्रत्यक्षरित्या टोला हाणला होता. आता शिवसेना नेते संजय राऊत यांचे यासंदर्भातील ट्विट खूप बोलके आहे. हे ट्विट सध्या राजकीय वर्तुळात चर्चेचा विषय बनले आहे.
राम मंदिराचा मुद्दा सध्या न्यायप्रविष्ट आहे. त्याची न्यायालयात सुनावणी सुरू असून दोन्ही बाजूंचे म्हणणे ऐकूण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे, असे पंतप्रधान मोदींनी नाशिकच्या महाजनादेश यात्रेत म्हटले होते. परंतु शिवसेनेने आपल्या सामनाच्या अग्रलेखातून मोदींवर निशाणा साधला.
राममंदिराचा विषय न्यायालयात आहे हे खरे, पण राममंदिर याविषयावर हवे तसे बोलणारे वाचाळवीर भाजपमध्येच आहेत. त्यामुळे पंतप्रधानांची नाशकातील चिडचिड समजून घेतली पाहिजे, असे टोकले आहे.
आता संजय राऊत यांनी ट्वीट करुन भाजपाला उत्तर दिले आहे. या ट्विटमध्ये मंदिर वही बनायेंगे हे वाक्य दिसते. पण यातील ’र’ हा शब्द खाली पडत आहे. त्यामुळे मंदि हाच शब्द फलकावर दिसतोय.
COMMENTS