नगरमध्ये मानाचा विशाल गणपती दिल्लीगेटच्या बाहेर


वेब टीम : अहमदनगर
शहराचे ग्रामदैवत तसेच मानाच्या विशाल गणपतीचा रथ विसर्जन स्थळाकडे दिल्लीगेट येथून सायंकाळी सहा वाजता बाहेर पडला. यावेळी गणेशभक्तांनी एकच जल्लोष केला.

गणपती बाप्पा मोरया… पुढच्या वर्षी लवकर या… असा एकच जयघोष यावेळी गणेशभक्तांनी केला. आपल्या लाडका बाप्पाला दहा दिवसांनंतर निरोप दिला आहे. या कल्पनेने अनेक गणेश भक्तांचे डोळे पाणावले होते.

यावेळी मानाच्या विशाल गणपतीचे विश्वस्त अभय आगरकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. दिल्लीगेट बाहेर यावेळी सामूहिक गणेश आरती झाली.

गणेश भक्तांनी यात सहभाग घेतला होता. मानाच्या विशाल गणपतीसमोर तीन ढोल पथक होते.

महिलांनी हिरव्या साड्या आणि भगवे फेटे घालून मराठी पारंपारिक गाण्यांवर मिरवणुकीत सहभाग घेतला होता, महिलांचा हा सहभाग लक्षवेधी ठरला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post
DNALive24 Marathi : Breaking & Latest Marathi News Live, Marathi News Updates