कोपरगावात संगमनेरसारखा विकास करू


वेब टीम : अहमदनगर
वर्तमानात काँग्रेस व भाजप यांच्यात फरक राहिलेला नाही, बहुतांशी काँग्रेस राष्ट्रवादीचे लोक भाजपात जात आहे. मात्र त्यांचा लवकरच भ्रमनिरास होणार आहे. संगमनेरची राजकारणाची सुसंस्कृत परंपरा या पुढेही सुरु ठेऊ असा विश्वास आमदार डॉ. सुधीर तांबे त्यांनी व्यक्त केला व कोपरगावातही संगमनेर सारखा विकास करून दाखवू असे आश्वासन दिले आहे.


अखिल भारतीय काँग्रेस पक्षाचा मेळावा व बैठक 11 सप्टेंबर रोजी कोपरगांव शहरातील व्यापारी धर्मशाळेत आयोजित केला होता. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कार्येकर्ते, पदाधिकारी, यांच्याशी चर्चा व विचारविनिमय करण्यासाठी, व कोपरगाव तालुक्यात लयाला गेलेले संघटन वाढविण्यासाठी तालुका काँग्रेसने “निर्धार मेळाव्याचे व कार्यकर्ता बैठकीचे” आयोजन केले होते.

बैठकीत आ. सुधीर तांबे, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष बाळासाहेब साळुंके, अल्पसंख्यांक सेलचे जिल्हाध्यक्ष अनिस शेख, ज्ञानदेव वाफारे, आदी मान्यवर तर स्थानिक युवक काँग्रेस चे जिल्हा महासचिव तुषारजी पोटे, साई संस्थानचे माजी विश्वस्त अशोक खांबेकर, प्रांतिक सदस्य बाबुराव पंडोरे, तालुकाध्यक्ष नितीन शिंदे, शहराध्यक्ष सुनील साळुंके, बबलू जावळे, सचिन होन, कैलास सोमासे, राजू पठाण, राजन त्रिभुवन आदींसह बहुसंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.

सदर प्रसंगी अशोक खांबेकर यांनी उपस्थितांना अभ्यासपूर्ण व कोपरगाव व जिल्हा काँग्रेस च्या इतिहासाची माहिती करून देत मार्गदर्शन केले. कोपरगाव तालुक्यात राष्ट्रवादीचा मागील निवडणुकीत तीन वेळा पराभव झाला असल्याने २०१४ च्या निवडणुकीत काँग्रेस ला राष्ट्रवादी पेक्षा जास्त मते होती तरी हि जागा काँग्रेसला सोडावी अशी मागणी युवक काँग्रेस कडून झाली. तालुक्यात कुठलीही आर्थिक सत्ता नसतांना सुद्धा काँग्रेसवर प्रेम करणारे लोक अद्याप आहेत. या बाबत समाधान व्यक्त केले.
दरम्यान या कार्यक्रमाचे अगोदर पासून व्यापारी धर्मशाळा परिसरात गोदावरी दूध संघाचे अध्यक्ष राजेश परजणे हे ठाण मांडून होते. त्या मुळे या कार्यक्रमाला येणाऱ्या काँग्रेसच्या कार्यकर्त्यांची कुचंबणा होत होती. त्यामुळे या कार्यक्रमास उपस्थित कार्यकर्त्यांत सर्वत्र याचीच खमंग चर्चा सुरु होती. दरम्यान एका विश्वसनीय कार्यकर्त्याने या बाबत आगामी निवडणुकीच्या प्रचार कार्यालयासाठी त्यांना व्यापारी धर्मशाळेची नोंदणी करावयाची असल्याची असल्याने ते तेथे आले होते असे सांगीतले मात्र त्यांनी हीच वेळ का निवडली त्यावर तो निरुत्तर झाला आहे.

तालुका अध्यक्ष नितीन शिंदे यांनी आपल्या प्रास्तविकात”कोपरगावला निळवंडेच्या पाण्याची गरज नसताना विनाकारण न होणाऱ्या कामाचे गाजर दाखवून प्रस्थापितांनी तालुक्यातील जनतेची फसवणूक सुरु ठेवली असल्या बद्दल नाराजी व्यक्त केली व नगरपालिकेचा पाच क्रमांकाचा साठवण तलाव होऊ द्यावा त्यात राजकारण आणू नये असे सांगून वैतरनेचे पाणी गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यात वळवावें, येवलेकरांनी मांजरपाड्याचे पाणी वळवून दाखवले मग चाळीस वर्ष एकाच घरात सत्ता असताना यांनी उद्योगांना जाणारे पाणी का थांबवले नाही असा सवाल उपस्थित केला. मुख्यमंत्र्यांशी जवळचे संबंध असल्याचा प्रचार केला जातो मग पश्चिम घाटमाथ्यावरील पाणी पूर्वेला का वळवले नाही असा रोकडा सवाल केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post