राष्ट्रवादीनेच माझा घात केला : सुजित झावरे


वेब टीम : अहमदनगर
स्वर्गीय वसंतराव झावरे यांनी राष्ट्रवादी पक्षाचे बिज पारनेर तालुक्यात रोवले. त्याचा वटवृक्ष झाल्यावर अनेकांनी झावरे कुटुंबियांबाबत राष्ट्रवादी नेतृत्वाची कान भरणी केली. त्यांचे ऐकल्याने राष्ट्रवादी ने माझा घात केला आहे. आपण येत्या आठ ते दहा दिवसात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत भाजपवासी होणार असून भाजप-शिवसेना युती तुटली तर आपण हुकूमशाही व गुंडशाही विरोधात निवडणूक लढवणार आहे. या दोन्ही शक्तींना पराभूत करून विजय मिळणार असल्याचा विश्वास माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे पाटील यांनी व्यक्त केला.

आगामी विधानसभा निवडणुकीत कुठली भूमिका घ्यायची याबाबत माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष सुजित झावरे यांनी पारनेर येथील लक्ष्मीनारायण मंगल कार्यालयात कार्यकर्त्यांचा संवाद मेळावा आयोजित केला होता. या मेळाव्यात विविध कार्यकर्त्या कडून पक्ष भाजपा होण्याबाबत विचारविनिमय करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना सुजित झावरे म्हणाले की स्व. वसंतराव झावरे यांनी राष्ट्रवादी मोठे योगदान दिले असतानाही या पक्षामध्ये त्याग, निष्ठा, प्रेम याला महत्व नसुन राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने माझा राजकीय घात केला आहे.

आगामी विधानसभेला युती तुटली तर विधानसभेचा उमेदवार मी असेल तसेच युती झाली तर जिल्हा परिषदेत जि.प.सदस्या सुप्रियाताई झावरे यांना अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष द्यावे अशी मागणी सुजित झावरे यांनी केली आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला बौध्दिक उंची किती आहे. सुपा औद्योगिक वसहतीत काय काय उद्योग करत असुन या पापाच्या पैशातुन देवदर्शन घडवण्याचे काम करत आहे. स्वयंघोषीत लोकनेत्यांनी दादांचा फोटो वापरू नये. स्वत:च्या मुलाऐवजी कार्यकर्त्यांना महामंडळ देणारे नेते स्व. वसंतराव झावरे हे आहेत. ७२ जि.प सदस्यांपैकी २० सदस्य हे तालुक्यात निधी देत असतात. जाणीवपूर्वक माझी बदनामी पक्षश्रेष्ठींशी करायची त्यामुळे हा पक्ष सोडण्याची तयारी सुरू केली आहे. विखे पाटील घराणे व ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे यांच्याशी कटुता पक्षासाठी घेतली होती.

या दोन्हीशी आमचे कोणत्याही प्रकारचे भांडण नाही. १५ वर्षे सत्ता नसताना एवढ्या मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते माझ्या बरोबर आहे हे माझे भाग्य आहे. आठ दिवसांमध्ये दिवसात मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस व नगरविकास मंत्री ना. राधाकृष्ण विखे पाटील यांच्या उपस्थितीत भाजपा मध्ये प्रवेश करणार आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचे बीज तालुक्यांमध्ये स्व. वसंतराव झावरे यांनी रोवले आहेत. कमी कालावधीत राजकीय निर्णय घेण्यासाठी हा संवाद मेळावा आयोजित केला आहे. १९९९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना झाली त्यावेळी स्व. वसंतराव झावरे यांनी त्यांच्याबरोबर जाण्याचा निर्णय घेतला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शरद पवार साहेबांच्या निष्ठेला तडा न जाता नारायण राणेंची ऑफर धुडकावून लावली आहे. स्व. वसंतराव झावरे यांच्या कालावधीत पाणलोटासह विविध कामे झाली आहे. भांडगाव काळु प्रकल्प वडझिरेंचा शिवडोह यासारखे दोनशे कोटी रुपयांची कामे केली आहे. परंतु नवोदित राष्ट्रवादी नेत्यांनी याबाबत अकलेचे तारे तोडले आहेत. जि.प.च्या माध्यमातून ४० कोटी रुपयांचा पाणी योजना आणता आल्या आहेत. कोण सोडुन गेले राहिले याचा विचार न करता काम करत आहे. भली मोठी रक्कम जिल्हाध्यक्षाला तिकीट देण्यासाठी कबूल केली आहे. केक कापून आमदार होता आले असते आम्ही तेच केले असते. तालुक्यात ज्या नव्या शक्ति उदयास येवु पाहतात ते मुळ खराब आहे. खंडणीपासुन अनेक गंभीर गुन्हा दाखल आहे अशा लोकांना उमेदवारी देणार का ? असा सवाल सुजित झावरे यांनी केला आहे. आंबेगावच्या मंडळीमुळे पवार साहेब हतबल असुन स्वत किल्ला वाचविण्यासाठी साहेबांचे कान भरत असल्याचा आरोप केला आहे. अनेक महाभाग सोडुन गेले त्यांनी विश्वास तोडला आहे. ते लोक सहज विसरले आहेत. विविध विकास कामे मार्गी लावण्यासाठी सत्ता महत्वपूर्ण आहे. विकास कामे व राजकारण याचा काही सबंध नाही. कोणी माणुस मारका आहे म्हणुन त्याच्याऐवजी दुसराला निवडुन द्यायचे का ? असा सवाल सुजित झावरे यांनी केला आहे. पारनेरला हक्काचे पाणी दिले नाही. पारनेर तालुकयातील मतांचा वापर त्यांनी केला आहे. पक्षावर प्रेम करून २००९ मध्ये स्व. वसंतराव झावरे यांचे राष्ट्रवादी पक्षाने तिकीट कापले. निष्कलंक आयुष्य जगलेल्या स्व वसंतराव झावरे यांच्याशी जे वागले तेच २०१९ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस करत आहे.  दरम्यान राष्ट्रवादी चे नेते दिलीप वळसे यांच्यावर गंभीर आरोप केले.
जि.प.सदस्या सुप्रियाताई झावरे, ह.भ.प दगडु कपाळे, दादासाहेब पठारे, माजी सभापती अरूणराव ठाणगे, माजी सभापती गंगाराम बेलकर, दिलीपराव ठुबे, अॅड बाबासाहेब खिलारी, बाजार समितीचे संचालक राहुल जाधव, विजय पवार, सोन्याबापु भापकर, सतीश पठारे, खंडु भाईक, मीराताई वरखडे, सुुुभाष बेलोटे, सुुुभाष आढाव, संंतोष भंडारी, निजाम शेख, जयसिंग गुुंजाळ, भागाजी गावडे, दिपक नाईक, योगश मते, बाळासाहेब माळी, सखाराम ठुुुबे, मोहन रोकडे, किसन धुमाळ, सरपंच लहुशेठ भालेकर, सरपंच विकास रेपाळे, उमेेेश सोनवणे, शिवााजी खोडदे, सतीश पिंपरकर, रामदास दाते, दत्तात्रय ठाणगे, कैलास न-हे, शहाजी कवडे, राधुुुुजी ठाणगे यांच्या सह कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होतेे.

यावेळी सूत्रसंचालन सोन्याबापु भापकर यांनी केले तर आभार मोहन रोकडे यांनी मानले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post