जमात उल मुजाहिद्दीनचा दहशतवादी अटकेत


वेब टीम : कोलकाता
पोलीसांच्या स्पेशल टास्क फोर्स (एसटीएफ) ने दहशतवादी संघटना जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेश (जेएमबी) च्या एका दहशतवाद्यास सोमवारी अटक केली.

मोहम्मद अबुल कशीम असे या २२ वर्षीय दहशतवाद्याचे नाव असून त्याला नहर इस्ट भागातून अटक झाली.त्याच्याजवळून काही गुप्त माहिती असलेली कागदपत्रे देखील हस्तगत केली.

या आधी पश्चिम बंगलाच्या बीरभूम जिल्ह्यातील पारूई येथील राहणाऱ्या ३० वर्षीय एजाजला कोलकाता पोलिसांच्या एसटीएफने मंगळवारी अटक केली होती.

एजजाने २००८ मध्ये दहशतवादी संघटनेत सहभागी झाल्यानंतर जेएमबीचा भारतातील मुख्य कमांडर कौसरची जागा घेतली होती.कौसला खगरागर स्फोट प्रकरणी एनआयएने अटक केली होती.

जमात-उल-मुजाहिद्दीन बांग्लादेश (जेएमबी)चा भारतातील प्रमुख एजाज अहमद हा उत्तर बंगालला संघटनेचा बालेकिल्ला करण्याच्या तयारीत होता.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post