त्यामुळेच मी आमदारकीचा राजीनामा दिला : अजित पवारांना अश्रू अनावर


वेब टीम : मुंबई
अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये खळबळ उडाली होती.

त्या पार्श्वभूमीवर अजित पवार यांनी आज दुपारी पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका स्पष्ट केली.

ते परिषदेत म्हणाले,”मी राजीनामा दिल्यापासून पवार कुटुंबात गृहकलह, गृहकलह अशा बातम्या येत आहेत. कसला गृहकलह? आमच्या कुटुंबात गृहकलह नाही.

पवार कुटुंब फार मोठं आहे. या कुटुंबात शरद पवार यांचाच शब्दच अंतिम असतो. त्यामुळे चुकीच्या बातम्या देऊ नका,असे आवाहन अजित पवार यांनी केले.

राज्य सहकारी बँक प्रकरणांत शरद पवार यांचा कोणताही संबंध नसताना त्यांचे नाव नाहक गोवले.

महत्वाच्या पदांवर शरद पवारांमुळे मी पोहचलो होतो. माझ्यामुळे त्यांना त्रास सहन करावा लागत असल्याचे पाहून अस्वस्थ झालो.

त्यामुळे राजीनामा दिल्याचे अजित पवार यांनी सांगितले. हे सांगताना अजित पवार पत्रकार परिषदेत भावूक झाले होते.

आपल्या आमदारकीचा राजीनामा दिल्यानंतर अज्ञातवासात गेलेले राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पत्रकार परिषदेत आपले मौन सोडले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठानमध्ये झालेल्या या पत्रकार परिषदेत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, छगन भुजबळ, धनंजय मुंडे, जितेंद्र आव्हाड आदींसह राष्ट्रवादीचे काही नेते उपस्थित होते.

काय म्हणाले पवार

  •  राजीनामा दिल्यामुळे पक्षनेते, कार्यकर्त्यांना वेदना झाल्या
  • उपमुख्यमंत्री असतानाही काही घटनांमुळे मी राजीनामा दिला होता.
  • कोणालाही न कळवता राजीनामा दिल्यामुळे अनेकांच्या भावना दुखावल्या. त्याबद्दल दिलगिरी व्यक्त केली.
  • तीन दिवसांपूर्वी विधानसभा अध्यक्षांसोबत बोलणे झाले होते.
  • विवेकबुद्धीला स्मरून राजीनामा दिला.
  • ११८८ कोटी रुपयांची अनियमितता झाली असल्याचे सहकार मंत्र्यांनी विधीमंडळाला सांगितले.
  • साडे बारा हजार कोटींच्या ठेवी बँकेत असताना २५ हजार कोटींचा घोटाळा कसा होईल?
  • एवढा मोठा घोटाळा झाला असता तर बँक बुडाली असती.
  • महाराष्ट्र राज्य सहकारी बँक ही शिखर बँक आहे….राज्यात संकट आले तर आऊट ऑफ वे जाऊन मदत केली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post