वेब टीम : सातारा खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा अध्यक्षांक...
वेब टीम : सातारा
खासदार उदयनराजे भोसले यांनी शनिवारी भाजपमध्ये प्रवेश केला. या पक्षप्रवेशापूर्वी उदयनराजे भोसले यांनी लोकसभा अध्यक्षांकडे आपल्या खासदारकीचा राजीनामा दिला.
त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघात पोटनिवडणूक घ्यावी लागणार आहे. आगामी विधानसभा निवडणुकीबरोबर साताऱ्याची पोटनिवडणूक पार पडण्याची शक्यता आहे.
या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार काँग्रेसच्या पक्षश्रेष्ठींनी साताऱ्यात उदयनराजेंविरुद्ध माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांचा रिंगणात उतरवायचे ठरवले आहे.
पृथ्वीराज चव्हाण यांना दिल्लीतून तसे आदेशही देण्यात आल्याचे समजते. त्यामुळे आता सातारा लोकसभा मतदारसंघाची निवडणूक चांगलीच चुरशीची होण्याची चिन्हे आहेत.
आघाडीच्या सध्याच्या समीकरणांनुसार साताऱ्याची जागा ही राष्ट्रवादीच्या वाट्याला येते. त्यामुळे राष्ट्रवादी ही जागा सोडायला तयार होणार का, हा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
मात्र, काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी दिल्लीत सोनिया गांधी यांची भेट घेतली होती. त्यावेळी यासंदर्भात चर्चा झाल्याची शक्यता आहे.
COMMENTS