उमेदवारी मिळाली नाही म्हणून कुणी गद्दारी करायची नाही : उद्धव ठाकरे


वेब टीम : मुंबई
भाजप–शिवसेनेची युती होणार हे आता निश्चित झाले आहे. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी स्वतः युतीची घोषणा एक दोन दिवसांत होणार असल्याचं सांगितले आहे.

शिवसेनेकडून मुंबईमध्ये आयोजित प्रमुख पदाधिकारी आणि इच्छुकांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरे बोलत होते.

यावेळी माझं आणि अमित शहाचं चांगलं बोलणं सुरु आहे, युतीची घोषणा आज-उद्यामध्ये होईल, असं त्यांनी सांगितले आहे.

५३ वर्षांत शिवसेना सत्तेत राहिली नाही, मात्र आमच्या भूमिकेकडे देशाचे लक्ष असते.

एकदिवस महाराष्ट्रात भगवा फडकल्याशिवाय राहणार नाही, बाळासाहेबांच्या शिवसैनिकाला मी एकदिवस नक्की मुख्यमंत्री बनवणार, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपला चुचकारले आहे.

मात्र दुसरीकडे भाजपसोबत युती होणार यावर देखील शिक्कामोर्तब केले आहे.

ज्या जागांवर भाजपचा उमेदवार असेल तिथे त्यांना पाठिबा देऊ., जिथे शिवसेनेचा उमेदवार असेल तिथे ते आपल्याला साथ देतील.

उमेदवारी मिळाली नाही, म्हणून कोणीही गद्दारी करू नये, असा सल्ला ठाकरे यांनी दिला आहे. दरम्यान, आता सर्वांचे लक्ष युतीच्या घोषणेकडे लागले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post