वंचित बहुजन आघाडीसोबत एमआयएमचा घटस्फोट; स्वतंत्र लढणार


वेब टीम : औरंगाबाद
वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएमध्ये फूट पडली आहे. एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी एमआयएम विधानसभा निवडणुका स्वबळावर लढवणार असल्याची घोषणा केली.

औरंगाबाद येथे बोलताना जलील यांनी प्रकाश आंबेडकरांनी आमचा मान राखला नसल्याची खंतही व्यक्त केली. लोकसभा निवडणुकीवेळी एमआयएमबरोबर हातमिळवणी करूनही वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांना मुस्लीम मते मिळाली नव्हती. त्यामुळे विधानसभेवेळी वंचित बहुजन आघाडी आणि एमआयएममध्ये काडीमोड होण्याच्या चर्चा होत्या.

एमआयएमने वंचित बहुजन आघाडीचे नेते अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्याकडे ९८ जागांची मागणी केली होती. त्यानंतर किमान ७४ जागा तरी द्याव्यात, अशी विनंतीही केली होती.

प्रकाश आंबेडकर आणि असदुद्दीन ओवेसी यांच्यात दोन बैठका झाल्या, तर इम्तियाज जलील यांच्याबरोबर तीन बैठका झाल्या. जागा वाटपाचा तिढा न सुटल्यामुळे एमआयएम आणि वंचित बहुजन आघाडीत बिघाडी झाल्याची शक्यता आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post