अब की बार २२० पार आणि त्यात संगमनेरलाही युतीचाच आमदार : विखे


वेब टीम : अहमदनगर
संगमनेरातील जनता भोळी-भाबडी असून जनतेच्या वाटेला फक्त आश्वासनेच मिळाली आहेत. तालुका दुष्काळमुक्त करण्यासोबत दहशतवाद मुक्त करणार, अशी खोचक टीका राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांवर केली.

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांच्या बालेकिल्ल्यात झालेल्या जाहीर सभेत “अब हवा करेगी रोशनी का फैसला” अशा शायरीने मुख्यमंत्र्यांनी भाषणाची सुरूवात केली. निळवंडे धरणाच्या अपूर्ण कालव्यांचं काम भाजप सरकारच मार्गी लावेल, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिलं.


थोरातांच्या बालेकिल्ल्यात गृहनिर्माण मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनीही थोरातांवर खास शैलीत टीका केली.

पुढील 25 वर्ष विरोधक सत्तेत येत नाहीत. त्यांनी विरोधक म्हणून अभ्यास करावा, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या यात्रेवर टीका केली.

नगर जिल्हयातील अकोले, संगमनेर आणि राहुरी येथे जाहीर सभा, तर महाजनादेश यात्रेच्या मार्गावरही ठिकठिकाणी मुख्यमंत्र्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post