युतीत शिवसेनेकडून कुठलाही दगाफटका होणार नाही : आदित्य


वेब टीम : मुंबई
'प्राण जाये पर वचन ना जाये' असं सांगत युती करताना शिवसेनेकडून कोणताही दगाफटका किंवा विश्वासघात होणार नाही' असं स्पष्ट वक्तव्य युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत केले आहे.


 येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि भाजपची युती होणार की नाही हा प्रश्न अजून सुटलेला नाही आहे. त्यावर आम्ही युती तोडणार नसल्याचं आदित्य ठाकरे यांनी म्हटलं आहे.

गेल्या काही दिवसांआधी उद्धव ठाकरे यांनीही 'आता युती कायम राहणार' असं सूचक विधान केलं होतं. त्यावर आता आदित्य ठाकरेंनीसुद्धा शिक्कामोर्तब केला आहे.

जागावाटपासंदर्भात उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री बोलत आहेत. इतर कोणालाच काय चाललं आहे याची माहिती नाही.

उद्धव साहेब आणि मुख्यमंत्री यांच्यात जे काही ठरलं आहे आणि युती जाहीर करताना राजकीय जे काही ठरलेलं आहे हे पत्रकार परिषदेमध्ये जाहीर करण्यात आलं.

'त्यावेळी जे काही ठरलं त्यामध्ये आमच्याकडून कधीही दगाफटका होणार नाही. विश्वासघात होणार नाही.' असं आदित्य ठाकरे म्हणाले आहेत.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post