युतीचे त्रांगडे कायम, फॉर्म्युला ठरेना, अमित शहा २६ ला पुन्हा मुंबईमध्ये


वेब टीम : मुंबई
अमित शाह रविवारी (22 सप्टेंबरला) मुंबई दौऱ्यावर होते. मात्र त्यावेळी त्यांनी पक्ष संघटनेचे आणि खासगी कार्यक्रमांसाठी मुंबई आले होते. त्यामुळे युतीच्या जागावाटपासंदर्भात कोणतीही चर्चा होऊ शकली नाही.

26 सप्टेंबरला अमित शाह यांचा पूर्वनियोजित दौरा आहे. त्यामुळे पुढील तीन-चार दिवसांत युतीच्या वरिष्ठ नेत्यांमध्ये चर्चा होणार असून त्यात सहमती झाल्यास अमित शाह यांच्या उपस्थितीमध्ये जागावाटपाचा अंतिम निर्णय होऊन युतीची घोषणा होण्याची शक्यता आहे.

शाह येत्या 26 सप्टेंबरला पुन्हा मुंबई दौऱ्यावर आहेत. त्यावेळी युतीच्या जागा वाटपाचा निर्णय होण्याची शक्यता आहे.

शिवसेनेला 120 जागांची ऑफर दिली आहे. मात्र शिवसेनेला भाजपची ही ऑफर मान्य नाही.

शिवसेनेला आणखी 20 जागांसाठी आग्रही असल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. त्यामुळे येत्या दोन दिवसात जागा वाटपाचा सुवर्णमध्य साधून नवीन फॉर्म्युला समोर येऊ शकतो.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post