चांगले खेळुनही मला संघाच्या बाहेर ठेवले : युवराज सिंग


वेब टीम : दिल्ली
क्रिकेट संघाचा माजी खेळाडू युवराज सिंहने भारतीय निवड समितीवर आरोप केला आहे की, त्याने २०१७ मध्ये यो-यो चाचणी पास करूनही भारतीय संघात त्याची निवड झाली नव्हती.

२०११ एक दिवसाच्या विश्वकप स्पर्धेत भारताच्या विजयात मोलाचे योगदान देणारा युवराज सिंह २०१७ मधील वेस्ट इंडिज दौऱ्यात फ्लॉप ठरला होता.

त्यानंतर त्याला भारतीय संघात पुन्हा येण्याची संधी मिळाली नाही.एका खासगी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत युवीने आपली खंत व्यक्त केली.

भारतीय क्रिकेट संघात आपले पुनरागमन होईल या आशेवर असलेल्या युवराज सिंहने त्या दिवसांच्या आठवणींना उजाळा दिला.

तो म्हणाला, ‘मी हा विचार कधीच केला नव्हता की चॅम्पियन्स ट्रॉफी २०१७ ज्या आसपास मी जे ८ किंवा ९ सामने खेळलो, त्यात दोन वेळा मॅन ऑफ द मॅचही राहिला. तरीही मला संघाबाहेर ठेवण्यात आले.’

‘मी जायबंदी होतो. मला सांगितले होते की मी श्रीलंका दौऱ्याची तयारी करावी. मग अचानक यो-यो चाचणी आली.

माझ्या निवडीत हा यु-टर्न होता. अचानक मला माघारी परतून वयाच्या ३६ व्या वर्षी यो-यो टेस्टची तयारी करावी लागली,’ असे युवराज म्हणाला.

तो म्हणाला,’मी यो-यो चाचणीही उत्तीर्ण झाले, मग मला सांगितले की, मी देशांतर्गत क्रिकेट खेळू.

त्यांना कदाचित असे वाटले असेल की माझं वय पाहता मी ही चाचणी उत्तीर्ण करणार नाही आणि मला संघाबाहेर ठेवणे त्यांना सोपे जाईल.’

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post