ED ने केला गुन्हा दाखल; अजित पवारांनी दिला राजीनामा


वेब टीम : मुंबई
राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांच्याकडे राजीनामा सोपवला असून त्यांनी तो मंजूर केला.

दरम्यान शरद पवार हे पुण्यात पुरग्रस्त भागाचा दौरा करत असताना अजित पवार यांनी अचानक राजीनामा दिला आहे. अजित पवार यांनी कोणत्या कारणामुळे राजीनामा दिला हे अद्याप पक्षातील नेत्यानाही माहित नसल्याचे सुत्रांकडून सांगण्यात येत आहे.


अचानक दिलेल्या या राजीनाम्यामुळे राजकीय चर्चेला उधाण आलंय. काही दिवसांपूर्वीच अजित पवार यांच्याविरुद्ध ED ने महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेच्या घोटाळाप्रकरणी गुन्हा दाखल झाला होता.

राजीनामा पत्रात कारण नाही दिलेले, फक्त राजीनामा मंजूर करावा अशी विनंती केली. विधानसभा अध्यक्ष यांनी राजीनामा मंजूर केला.
दरम्यान, अजित पवारांच्या राजीनाम्यावर शरद पवार यांची रात्री 8 वाजता पत्रकार परिषद घेणार असल्याची माहिती राष्ट्रवादीचे प्रवक्ते अंकुश काकडे यांनी दिली.
-------- - ----------

अजित पवार यांनी आमदारकीचा राजीनामा दिला ही बातमी मला पुण्याला येताना समजली. मला यासंदर्भातली मला कोणताही कल्पना नव्हती. मी त्यांना, त्यांच्या कुटुंबीयांना संपर्क साधला.  असं शरद पवार यांनी पुण्यात झालेल्या पत्रकार परिषदेत सांगितलं. अजित पवार म्हणाले की, शिखर बँक घोटाळा प्रकरणात ज्या काही घडामोडी घडत आहेत त्याला मी तोंड देतो आहे. मात्र यात काकांचं  म्हणजे माझं  नाव आल्याने मी अस्वस्थ झालो. त्यांच्यामागे चौकशीचं शुक्लकाष्ठ मागे लागलं आहे त्याच उद्विगनतेतून अजित पवार यांनी राजीनामा देत असल्याचं कुटुंबीयांना सांगितलं. अशी माहिती शरद पवार यांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post