'ही' कंपनी देणार ३ लाख नोकऱ्या


वेब टीम : दिल्ली
फूड डिलिव्हरी करणारी कंपनी स्विगी ब्लू कॉलर (शाररीक श्रम) नोकरी देणारी सर्वात मोठी खासगी कंपनी ठरू शकते.

१८ महिन्यात तीन लाख लोकांना रोजगार देण्याची शक्यता आहे. त्यानंतर कंपनीत काम करणाऱ्यांची संख्या ही पाच लाख होण्याची शक्यता आहे.

स्विगीचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहर्ष मजेटी यांनी कंपनीच्या वार्षिक बैठकीत सांगितले की, स्विगीची वाढ अशीच कायम राहिल्यास देशात लष्कर आणि रेल्वेनंतर सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी म्हणून नोंद होईल.

भारतीय सैन्यात सध्या १२.५ लाख सैनिक कार्यरत असून रेल्वेत मार्च २०१८ अखेरीस १२ लाखाहून जास्त कर्मचारी आहेत.

तर, खासगी आयटी कंपनी टीसीएसमध्ये ४.५ लाख कर्मचारी आहेत. खासगी क्षेत्रात सध्या सर्वाधिक रोजगार देणारी कंपनी म्हणून टीसीएसचा लौकीक आहे.

टीसीएसमध्ये सर्वाधिक इंजिनिअर काम करतात.सैन्य, रेल्वे आणि टीसीएसमध्ये कायमस्वरूपी रोजगार दिला जातो.

तर, ब्लूकॉलर जॉब असलेल्या स्विगीमध्ये डिलिव्हरी कर्मचाऱ्यांना त्यांच्या कामाच्या आधारे पगार दिला जातो. या संदर्भातील वृत्त एका खासगी वृत्त संस्थेने दिले.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post