न्यायदेवतेच्या डोळ्यावर पट्टी बांधून आरेत वृक्षतोड : राऊत


वेब टीम : मुंबई
आरे वसाहत वन म्हणून जाहीर करण्याची तसेच आरेतील मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेसाठी २६४६ झाडे हटवण्यास पालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाने दिलेली मंजुरी अवैध ठरवून रद्द करण्याची पर्यावरणवादींची मागणी उच्च न्यायालयाने शुक्रवारी फेटाळली.

त्यामुळे आरेतील मेट्रो कारशेडचा मार्ग मोकळा झाला. त्यानंतर शुक्रवारपासून आरेतील वृक्षतोडीला सुरूवात झाली.

शिवसेनेचे ज्येष्ठ नेते खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना सोशल मीडियावरून टोला लगावला.

संजय राऊत त्यांच्या ट्विटर खात्यावरून एक फोटो शेअर केला.त्यामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे न्यायदेवतेच्या डोळ्यावर एक कपडा बांधल्याचे दाखवले आहे.

तसेच त्यावर ‘आरे हे जंगल नाही’ असे ही नमूद केले आहे. या चित्रातून राऊत यांनी थेट मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला. मुंबई उच्च न्यायालयाने पर्यावरण प्रेमींनी दाखल केलेले अर्ज शुक्रवारी फेटाळले.

न्यायालयाच्या निर्णयानंतर कारशेडच्या जागेवरील झाडे तोडायला शुक्रवारी रात्रीच सुरुवात झाली.

स्थानिकांनी दिलेल्या माहिती नुसार शुक्रवारी रात्रीत जवळपास चारशेहून अधिक झाडांची कत्तल करण्यात आली. हे काम पोलीस सुरक्षेत सुरू होते.

वृक्षतोडीची माहिती समजाताच विविध ठिकाणाहून बऱ्याच पर्यावरणप्रेमी कारशेडच्या बाहेर विरोधासाठी जमले होते.

कारशेडच्या जागी कोणालाही प्रवेश नसल्याने बाहेर रस्त्यावरच ठिय्या दिला. आतापर्यंत आरेमधील वृक्ष तोडी विरोधातील ३८ आंदोलकांना अटक केली असून एकूण ५५ जण ताब्यात घेतले आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post