विमानाच्या अपघातात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिक ठार


वेब टीम : तेलंगणा
विकाराबाद जिल्ह्यातील सुलतानपूर गावात उड्डाण करणाऱ्या विमानाच्या अपघातात दोन प्रशिक्षणार्थी वैमानिक ठार झाले.

प्रकाश विशाल आणि अमनप्रीत कौर अशी मृतांची नावे आहेत. सकाळी उड्डाण केलेल्या या विमानाचा 11.55 वाजल्या नंतर हैदराबादमधील बेगमपेट स्टेशन सोबतचा संपर्क तुटला होता.

आज दुपारी पावणे एकच्या सुमारास दोन प्रशिक्षणार्थी वैमानिक असलेले विमान कोसळले, यात दोघांचाही जागीच मृत्यु झाला.

ह्या विमानाने बेगमपेट विमानतळावरून उड्डाण केले आणि ते विकाराबादमध्ये कोसळले.

याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेह पोस्टमार्टमसाठी हलवण्यात आले आहेत, अशी माहिती विकाराबाद पोलिसांनी दिली.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post