आदित्य ठाकरेंच्या विरोधात राष्ट्रवादीकडून 'याला' उमेदवारी


वेब टीम : मुंबई
आदित्य ठाकरेंच्या विरोधात वरळीत राष्ट्रवादीतून सुरेश माने यांना उमेदवारी दिली आहे.

यापूर्वी वरळी मतदार संघातून आपण विधानसभा लढवणार असल्याचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांनी जाहीर केले आहे.

वरळी विधानसभा मतदारसंघ हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो. परंतु आदित्य ठाकरे यांच्याविरोधात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षांनी उमेदवार देण्याचा निर्णय घेतला आहे.

सुरेश माने यांना उमेदवारी दिल्याची जोरदार चर्चा आहे.

आपल्याला वरळीचा विकास करायचा आहे मात्र सोबत महाराष्ट्रदेखील पुढे न्यायचा आहे.

संपूर्ण महाराष्ट्र माझी कर्मभूमी असून त्यासाठी काम करणार आहे. फक्त वरळी नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रासाठी काम करणार आहे.

मी प्रत्येक गावात प्रचार केला पाहिज. त्यामुळे तुन्ही माझा प्रचार करा, असे आवाहन आदित्य ठाकरे यांनी स्वतःची उमेदवारी जाहीर करताना शिवसैनिकांना केले होते.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post