उत्तरेतील पिता- पुत्रांनी १२-० ची नैतिक जबाबदारी स्वीकारून राजीनामा द्यावा


वेब टीम : अहमदनगर
जिल्ह्यातील लोकसभा निवडणुकीच्या आधी पक्षांच्या पोषक वातावरणाचा फायदा घेत उत्तरेकडील नेत्यांनी भाजपच्या पक्ष नेतृत्वाला खोटी चुकीची आश्‍वासने दिली.

 लोकसभेत आपल्या चिरंजीवांचा बालहट्ट पुर्ण करतांना येणार्‍या विधानसभेत जिल्ह्यात 12-0 आमदार निवडून आणण्याच्या बोलीवर व देशात नरेंद्र – राज्यात देवेंद्रजींच्या अतिशय चांगल्या कामगिरीमुळे पिता – पुत्राने जिल्ह्यात निवडणूका जिंकल्या.

 परंतु उत्तरेतील वारसा हक्कातुन आज पर्यंत आपल्या पेक्षा कोणीही वरचढ होऊ नये हि परंपरा कायम राखत उत्तरेतील नामदारांनी पक्षाचे 12-0 चा नारा गाठोड्यात बांधून जिल्ह्यातील महायुतीचे अनेक मंत्री – आमदारांना घरी पाठवण्याचे दुष्कृत्य ह्या पिता – पुत्राने केले ही नगर जिल्ह्यातील जनता संपूर्णपणे जाणुन आहे.

त्यामुळे त्यांनी नैतिक जबाबदारी स्विकारीन राजीनामे द्यावेत, अशी मागणी भाजपाचे शहर जिल्हा उपाध्यक्ष अन्वर खान यांनी केली आहे.

मुख्यमंत्र्यांचे संकट मोचक संबोधले जाणारे मा.ना.मंत्री महोदयांना हेलीकॉप्टरव्दारे नगर जिल्हा ते मुंबई पर्यंत सफर घडवतांना सोबत बॅग (कपडे – कागदपत्रांची) घेऊन फिरले.

संकट मोचक महोदयांना जिल्हा बाबत हेलीकॉप्टर मधे संपूर्ण दिशाभूल करणारी व खोटे फाजील आश्‍वासनाच्या माध्यमातून मुख्यमंत्री यांना चुकीची माहितीच्या आधारे उत्तरेतील पिता – पुत्रांनी जिल्ह्यातील भाजप-शिवसेना महायुतीमय असलेले संपूर्ण पोषक वातावरण खराब केले.

पदरी आलेली निराशेमुळे आज राज्यात येणारी सेना-भाजप महायुतीची एक हाती सत्ता स्थापनेसाठी नको त्या अडचणी झेलाव्या लागत आहेत. हे पक्षश्रेष्ठींनी वेळीच ओळखण्याची गरज आहे.

उत्तरेतील या मंत्री महोदयांना स्वत:च्या पुढे कोणी जाऊ नये म्हणून यावृत्तीतुन घरचे जवळचे नातेवाईकांना सुध्दा धुळ चारली कायतर जिल्ह्यातुन महत्त्वाचे मंत्री पद – पालकमंत्री पद हे आपल्याला मिळवे हेच कारण असल्याचे नागरिकातुन प्रतिक्रिया येत आहेत.

लोकसभा निवडणूकीसाठी भाजप-शिवसेना महायुतीचे नगर जिल्ह्यातील मंत्री – आमदार यांनी 12-0 या भुलथापांना बळी पडून संपूर्ण खासदारकीच्या निवडणूकीत जिवाचे रान केले.

चपला झिजवल्या कारण आपल्याला पिता – पुत्रांची मोठी मदत आपल्या आगामी विधानसभा निवडणुकीत होण्याच्या आशेने मनाने वेळ प्रसंगी तण-मन-धनाचे माध्यमातून प्रामाणिकपणे मोठ्या मताधिक्याने निवडून दिले. परंतु सर्वांची घोर निराशा या उत्तरेकडील पिता-पुत्राने केल्याचे आता समोर येत आहे.

राष्ट्रीय अध्यक्ष अमीत शाह – पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना कळकळीची विनंती आहे की, आपल्याकडे जामनेरचे मांडवली बादशाह – मोठे नेते या लबाड पिता – पुत्रांची मंत्री पदासाठी किंवा मोठ्या महामंडळासाठी किंवा अन्य कुठलेही पदासाठी शिफारस घेऊन आल्यास हाकलून लावा.

या उत्तरेकडील पिता – पुत्रा सोबतच जामनेरचे मांडवली किंग मंत्री महोदयांनी भाजपा पक्षाची झालेली पिच्छेहाटची नैतिक जबाबदारी स्वीकारून आपल्या आमदारकीचा व उत्तरेतील पिता-पुत्राने आपल्या खासदार की – आमदारकीचा त्वरीत राजीनामा द्यावा असे आवाहन भाजप शहर जिल्हा उपाध्यक्ष हाजी अन्वर खान यांनी राज्याचे मुख्यमंत्री, भाजप अहमदनगर शहराचे अध्यक्ष व जिल्हाध्यक्ष यांचेकडे लेखी पत्रकाव्दारे केलेली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post