संग्राम जगताप, अनिल राठोड यांच्यासह जिल्हाभरातील दिग्गजांचे उमेदवारी अर्ज दाखल


वेब टीम : अहमदनगर
विधानसभा निवडणुकीसाठी गुरुवारच्या मुहूर्तावर नगर शहर मतदार संघातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे आ.संग्राम जगताप, शिवसेना-भाजपा महायुतीचे अनिल राठोड यांच्यासह जिल्ह्यातील दिग्गज उमेदवारांचे अर्ज दाखल करण्यात आले आहेत.

नगर शहरातून शिवेसनेचे अनिल राठोड यांनी शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी त्यांच्या समवेत भाजपाचे जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते सदा देवगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख प्रा.शशिकांत गाडे यांच्यासह युतीचे पदाधिकारी उपस्थित होते. 

तर विद्यमान आमदार व राष्ट्रवादीचे उमेदवार संग्राम जगताप यांनी आई-वडील व आयटीपार्कमधील युवकांच्या उपस्थितीत साधेपणाने उमेदवारी अर्ज दाखल केला. आ.जगताप यांनी लोकसभा निवडणुकीवेळी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबाच्या उपस्थितीत अर्ज दाखल केला होता. 

शेवगाव-पाथर्डी मतदार संघातून भाजपाच्या मोनिकाताई राजळे यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी पालकमंत्री राम शिंदे, गृहनिर्माणमंत्री राधाकृष्ण विखे, माजी खा.दिलीप गांधी उपस्थित होते. 

कोपरगाव मतदारसंघातून भाजपाच्या आ.स्नेहलता कोल्हे यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. कर्जत-जामखेड मतदार संघातून राष्ट्रवादीचे युवानेते रोहित पवार यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

पारनेरमधून विधानसभेचे उपाध्यक्ष विजय औटी यांनी शिवसेनेकडून अर्ज दाखल केला तर त्यांच्या विरोधात राष्ट्रवादीच्यावतीने निलेश लंके यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. 

श्रीगोंद्यात भाजपाचे बबनराव पाचपुते यांनी शक्तीप्रदर्शन करीत उमेदवारी अर्ज दाखल केला. राहुरीत भाजपाचे आ.शिवाजी कर्डिले यांनी खा.डॉ.सुजय विखे यांच्या उपस्थितीत उमेदवारी अर्ज दाखल केला. 

पारनेरमध्ये शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अपक्ष अर्ज दाखल केला असून राष्ट्रवादीतून बाहेर पडलेले जि.प.माजी उपाध्यक्ष सुजित झावरे यांनीही उमेदवारी अर्ज दाखल केला.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post