अखेर महाराष्ट्रपुढे दिल्लीश्वर झुकलेच : अमित शहा घेणार उद्धव यांची भेट


वेब टीम : मुंबई
मुख्यमंत्रिपदाच्या दाव्यासह सत्तेत समान वाटा हवा, या मागणीसाठी शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

आता हा तिढा सोडविण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा मुंबईत येणार आहेत.

शहा यांनी उद्धव ठाकरेंना फोन केला. दोन्ही नेत्यांमध्ये औपचारिक चर्चा झाली.

तसेच या चर्चेत दिवाळीनंतर उद्धव यांची मुंबईत भेट घेणार असल्याचे संकेत अमित शहा यांनी दिले आहेत.

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर शिवसेनेने आक्रमक भूमिका घेतली आहे.

सत्तेत समान वाटा तसेच मंत्रिमंडळात अधिक मंत्रिपदे देण्याची मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

तसेच आगामी मुंबई महापालिका निवडणुकीत मोकळीक द्यावी, अशी मागणीही शिवसेनेकडून करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post