गोपीनाथरावांच्या पावलावर पाऊल टाकत पंकजांचे काम : अमित शहा


वेब टीम : बीड
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी सावरगाव येथे आयोजित केलेल्या दसरा मेळाव्याला केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी उपस्थिती लावत प्रचाराचा नारळ फोडला.

अमित शाह यांनी जम्मू काश्मीरमधील कलम ३७० रद्द केल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांचे नागरिकांनी आभार मानले. यावेळी ३७० कलम रद्द केल्यामुळे अमित शाहांना ३७० तोफांची सलामी देण्यात आली.

पाच वर्षांपूर्वी मी दसऱ्याच्या दिवशीच भगवान गडावर आलो होतो. आज भगवानभक्ती गडावर आलो आहे. दिवंगत गोपीनाथरावांच्या पावलावर पाऊल ठेवत पंकजा मुंडे वाटचाल करत आहेत.

ऊसतोड कामगारांसाठी गोपीनाथ मुंडेंनी जे काम केलं, तेच काम आज पंकजा मुंडे करत असल्याचं अमित शाहांनी म्हटलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या नेतृत्वात देश पुढे जात आहे. वंचितांचा विकास सरकार करत आहे, असंही अमित शाहांनी म्हटलं.

कलम ३७० हटवून संपूर्ण देशाला एकत्र आणण्याचे काम नरेंद्र मोदी यांनी केले. तुम्ही मोदी सरकारला स्पष्ट बहुमत दिलं, त्यामुळे मोदी सरकारने कलम ३७० रद्द करुन दाखवलं, असं अमित शाह यांनी म्हटलं.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post