शरद पवारांना त्यांच्या विकासकामांचा हिशेब मागा : अमित शहा


वेब टीम : सांगली
महाराष्ट्राची सत्ता पंधरा वर्षे काँग्रेस व राष्ट्रवादीच्या ताब्यात होती. पण त्यांनी विकास केला नाही. तेव्हा महाराष्ट्राचा विकास खुंटला होता. राज्यातील काँग्रेस व राष्ट्रवादीचे नेते सांगली जिल्ह्यात आल्यानंतर त्यांच्याकडे विकासाचा हिशोब मागा.

शरद पवारांना हिशोब मागा. राज्यात आघाडीचे सरकार असताना केंद्रात मनमोहनसिंग पंतप्रधान होते, त्यांना विचारा त्यांनी महाराष्ट्रासाठी काय केले? गेल्या पाच वर्षात युतीच्या सरकारने महाराष्ट्राचा विकास केला.

विकासाची गंगा पुढे नेण्यासाठी पुन्हा एकदा फडणवीस सरकार निवडून द्या, असे आवाहन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केले.

सांगली जिल्ह्यातील जत येथे युतीचे उमेदवार विलासराव जगताप यांच्या प्रचारार्थ आयोजित सभेत ते बोलत होते.

यावेळी पालकमंत्री सुभाष देशमुख, मंत्री सुरेश खाडे, आमदार सुधीर गाडगीळ, विलासराव जगताप, मकरंद देशपांडे, निताताई केळकर आदी नेते उपस्थित होते.

अमित शहा म्हणाले, महाराष्ट्रात सलग पंधरा वर्षे काँग्रेसची व राष्ट्रवादीची सत्ता होती. या काळात त्यांनी कोणताही विकास केला नाही राष्ट्रवादीचे नेते शरद पवार हे सांगली जिल्हात आल्यावर त्यांना विचारा विकास का झाला नाही.

मात्र गेल्या पाच वर्षात महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मोठ्या प्रमाणात महाराष्ट्राचा विकास केला. असून चार हजार 960 कोटी रुपये म्हैसाळ योजनेसाठी दिले आहेत. 3000 कोटी रुपये टेंभू योजनेसाठी दिले आहेत.

 याशिवाय महाराष्ट्रातील अनेक योजनांसाठी केंद्रातून निधी दिला असून जत तालुक्याच्या पूर्व भागातील गावांना तुबची बबलेश्‍वर योजनेतील पाणी मिळावे यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांशी फडणवीस यांनी बोलणी केली आहे.

0/Post a Comment/Comments

Previous Post Next Post